Sunday, June 4, 2023

स्कार्पिओ जीप झाडाला धडकून मोठा अपघात; 3 जण जागीच ठार

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये एक स्कार्पिओ जीप झाडाला धडकून मोठा अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये किशोर आण्णाराव भोसले, नितीन भगवान भांगे, आणि व्यंकटेश राम म्हेत्रे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर राकेश हुच्चे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात घडला तेव्हा हे चौघेजण स्कार्पिओ गाडीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गेले होते.

या दुर्घटनेतील मृत नितीन भांगे हा मंडप कंत्राटदार होता. यामुळे मृत नितीन औराद येथे विद्युत रोषणाईच्या कामासाठी आपल्या सहका-यांना सोबत घेऊन गेला होता. त्या ठिकाणाहून परतत असताना विजापूर-सोलापूर महामार्गावर तेरा मैलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर त्यांची स्कार्पिओ जीप आदळली आणि हा भीषण अपघात घडला. मंद्रूप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.