दहा महिन्याच्या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण; एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून ओंकारचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी चिमुकल्याच्या अपहरणाची घटना फलटण तालुक्यातील काळज गावी घडली. मंगळवार दि .29 सप्टेंबर ला राहत्या घरातून चि .ओंकार भगत या चिमुकल्याच अपहरण करण्यात आलं होतं. या घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरवून सोडला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सदर प्रकार एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतून झाला आसल्याचे उघड झाले आहे. सातारा पोलिसांनी यासंबंधी एकाला अटक केलेली असून अधिक तपास सुरु आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.
                
हाती आलेल्या माहितीनुसार, १ आॅक्टोंबर रोजी सकाळी सदर चिमुकल्याच्या राहत्या घरा शेजारील विहिरी मध्ये त्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत सापडला होता. यानंतर गावकर्‍यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. हे कृत्य करणारा आरोपी घरा जवळ राहणाराच कोणी तरी असणार असा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची सुत्रे वळवली. सातारा पोलिसांनी २२ अधिकारी यांची १२ शोध पथके या शोध मोहिमे करता तयार केली होती. अखेर सदर घटनेला एकतर्फी प्रेमाची झलक असल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेमाच्या मानसिकतेतूनच आरोपीने असे कृत्य केल्याचे समजत आहे.

मृत चिमुकल्याच्या आईने आरोपीसोबत फोनवर बोलण्यास नकार दिल्याने आपण हे कृत्य केल्याचा जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे. चिमुकल्याच्या आईने आरोपीस प्रतिसाद न दिल्याने तो राग मनात ठेवून त्याने ओमचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी एकास अटक केली असून अधिकचा तपास सुरु आहे असे सातपुते यांनी सांगितले आहे.

दरम्यान, फलटण तालुक्यातील चिमुकल्याच्या अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी तपासाची सर्व सुत्रे हाती घेतली होती. सबंध पोलिस यंत्रणा मागील दोन दिवस रात्रंदिवस तपासात लागली होती. त्यांच्या बरोबरच गावातील युवक व स्थानिक प्रशासनाकडुन ओंकार चा युध्दपातळीवर तपास सुरू होता. सातारा पोलिसांनी आता अखेर मुख्य आरोपीस शोधुन काढले असून वेगाने खून्याचा शोध लावून एकास अटक केल्याने नागरिकांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.