सातारा प्रतिनिधी | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सातारा जिल्हा सुद्धा त्यास अपवाद नाही. अनेक निर्बंध घालून देखील साताऱ्यात सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तत्काळ कोरोना बाधित क्षेत्रामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा, असे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकाद्वारे आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी सिंह यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, कोविड संक्रमित प्रति रुग्णामागे रुग्णाच्या संपर्कात आलेले किमान २५ नागरिकांचा शोध घेणे बंधनकारक आहे.
कोविड संक्रमित रुग्ण सापडलेनंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ७२ तासांच्या आत शोध घेणेत यावा व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण करावे.
कोविड संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेले अथवा प्रवासात आलेले नागरिकांची हाय रिस्क व लो- रिस्क अशी वर्गवारी करुन हाय रिस्क मधील नागरिकांची कोरोना चाचणी करणेत यावी.
कोविड संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेले हाय रिस्क नागरिकांची जास्तीत जास्त कोविड तपासणी
होईल याबाबत सूक्ष्म नियोजन करावे.
कोविड संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेले सर्व नागरिकांना गृह विलगीकरण बंधनकारक राहिल.
कोविड संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची RT, PCR, RAT द्वारे टेस्ट करावी
ज्या ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णसंख्या वाढलेली आहे अशा भागात घर ते घर सर्वेक्षण करावे
संपर्कात आलेल्याचा शोध घेण्याची जबाबदारी शहरी भागासाठी मुख्याधिकारी, नगरपालिका यांची असेल. तसेच ग्रामीण भागासाठी ग्रामस्तरीय समितीची असेल. त्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग संबंधित वैदयकिय अधिकारी व आशा वर्कर यांची भूमिका महत्वाची असेल, असे आदेश जिल्हाधिकारी सिह यांनी पत्रकाद्वारे दिले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group