हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : 100 वर्षांहून जुना इतिहास असलेली खाजगी क्षेत्रातील नैनिताल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती नुसार या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत.
ताज्या दर वाढीनंतर, बँकेने 1 वर्ष आणि त्याहून जास्त मात्र 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. आहेत. यासोबतच बँकेने एक नवीन योजना देखील सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे नैनी उत्कृष्ट टर्म डिपॉझिट स्कीम. ही टर्म स्कीम 605 दिवसांसाठी आहे. Bank FD
व्याजदर किती असेल ???
आता बँकेकडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.25% आणि 46 दिवस ते 179 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.25% व्याज दर मिळेल. त्याच बरोबर 180 दिवस आणि त्यापेक्षा जास्त मात्र 270 दिवसांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.95% व्याजदर मिळेल. त्याच बरोबर 270 दिवस आणि त्यापेक्षा जास्त दिवसांच्या टर्म डिपॉझिट्सवर 5.05% व्याजदर मिळत राहतील. Bank FD
नैनी उत्कृष्टवर सर्वाधिक व्याज
बँकेने 1 वर्ष किंवा त्याहून जास्त मात्र 18 महिन्यांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.55% वरून 5.75% पर्यंत वाढविला आहे. नैनीताल बँकेने नैनी उत्कृष्ट टर्म डिपॉझिट्स स्कीम नावाची एक नवीन योजना देखील सुरू केली आहे. याचा कालावधी 605 दिवसांचा असेल आणि ग्राहकांना त्यांच्या डिपॉझिट्सवर सर्वाधिक 6.05% व्याज मिळेल. Bank FD
यामध्ये 18 महिने ते 5 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 5.60% व्याजदर 5 वर्षांत मॅच्युर होणारी मात्र 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर 5.35% व्याजदर दिला जात आहे. आता बँक नैनी टॅक्स सेव्हर स्कीमवर 5 वर्षांसाठी 5.75% दराने व्याज देत राहील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेकडून 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर दिला जाईल. हा नियम नॅनी टॅक्स सेव्हर स्कीम वगळता ज्येष्ठ नागरिकांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी टर्म डिपॉझिट्सच्या सर्व कालावधीसाठी लागू आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nainitalbank.co.in/
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे
HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ
Poco M5 : Poco M5 भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!