Poco M5 : Poco M5 भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी स्मार्टफोन (Poco M5) निर्माता कंपनी Poco ने आपला नवीन स्मार्टफोन Poco M5 भारतात लॉन्च केला आहे. खूपच कमी किमतीत उपलब्ध असणाऱ्या या मोबाईलचे वैशिष्ट्य कोणत्याही फ्लॅगशिप स्मार्टफोनपेक्षा कमी नाही. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनचे काही खास वैशिष्ट्ये आणि किंमत…

6.58-इंचाचा डिस्प्ले –

पोको (Poco M5) M5 ला 90 Hz च्या रिफ्रेश रेटसह आणि 240 Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह 6.58-इंचाचा IPS फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देखील आहे. या स्मार्टफोनला मागील पॅनल लेदर टेक्सचरसह येतो आणि हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हा टेक्सचर फोनला घसरू देत नाही आणि लेदरचा फील येतो. या मोबाईल फोनचे एकूण वजन 201 ग्रॅम आहे.

Poco M5

कॅमेरा – (Poco M5)

मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचे तर, या Poco फोनमध्ये पाठीमागील बाजूस तीन कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50-मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल आणि तिसरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा चार्ज केल्यांनतर ती 2 दिवस टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे.

Poco M5

किंमत –

कनेक्टिव्हिटीसाठी,या स्मार्टफोन मध्ये Wi-Fi, Bluetooth v5, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक, 4G आणि हाय-रिस ऑडिओ सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. POCO M5 काळा, निळा आणि पिवळा या तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. मोबाईलच्या किमतींबाबत बोलायच झाल्यास Poco M5 च्या 4 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आणि 128 GB स्टोरेजसह 6 GB रॅमची किंमत 14,499 रुपये आहे.

हे पण वाचा :

Oppo A57e : Oppo ने लॉन्च केला बजट स्मार्टफोन; पहा फीचर्स आणि किंमत

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Redmi Note 11 SE चा पहिला सेल आजपासून सुरु, जाणून घ्या या स्वस्त स्मार्टफोनचे 10 फीचर्स !!!

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत