हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंटेनर मधून वाहतुक केली जात असलेला 1 हजार किलो गांजा आज तेलंगणा पोलिसांनी पकडला. यावेळी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.3 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक कंटेनर गाजाची वाहतुल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून कंटेनरला अडवले. कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 1 हजार किलो गांजा सापडला. या गांजाची किंम्मत 1.3 कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Telangana: 1010 kg ganja worth more than Rs 1.3 Crores seized from a lorry container in Ranga Reddy District today; 2 persons arrested pic.twitter.com/CwxTLn4IDA
— ANI (@ANI) October 5, 2020
दरम्यान, गांजाची वाहतुक नक्की कोठे चालली होती हे अद्याप समजू शकलेले नाही. गांजा वाहतुकीची संपुर्ण साखळी कार्यरत असून याचा म्होरक्या कोण याचा शोध तेलंगणा पोलिस घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून यामुळे अवैध्य धंद्यांना चांगलीच चपराल बसली आहे.