मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगलोर | लोकशाही राष्ट्रात कोणत्याही सरकार बहुमानातले कधी अल्पमतात येईल आणि कधी पायउतार होईल या बद्दल काहीच सांगता येत नाही. असाच एक फिल्मी प्रकार कर्नाटक मध्ये बघायला मिळत आहे. येथील जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसयांच्या घडीचे सरकार कोसळण्याच्या गर्तेत सापडले आहे. कारण मुख्यमंत्री कुमार स्वामी अमेरिकेच्या दौऱ्यात आहेत. तर १२ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात येऊन पोचले आहेत.

सूत्रबद्ध पध्द्तीने सर्व गोष्टींना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या १२ आमदारांनी आपला मोबाईल देखील ऑफ करून ठेवला आहे. १२ आमदारापैकी ९ आमदार काँग्रेसचे असून ३ आमदार जनता दलाचे आहेत. काँग्रेसची सत्ता गेल्यावर ज्या आमदारांची मंत्रीपदे गेली. त्यांनी नेहमीच कुमार स्वामी यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच परिपाक म्हणून आजचे राजीमाना सत्र समोर आले आहे.

दरम्यान कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी.परमेश्वर आणि राज्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या उरलेल्या आमदारांची आणि नगरसेवकांची तातडीने बैठक बोलावली आहे.कर्नाटक विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजप आज विरोधी पक्षात बसला आहे. याची भाजपला खंत वाटते म्हणून भाजप कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. बारा आमदारांनी आमदार दिला कि ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : १०४
कॉंग्रेस : ७०
जनता दल : ३९

Leave a Comment