हत्येसह 11 गंभीर गुन्हे असणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाने भाजपात केला प्रवेश

Ajay Sarkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार या दोन्ही गटांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. यामध्ये आता चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने (Ajay Sarkar) भाजपात प्रवेश केल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने (Ajay Sarkar) भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चंद्रपूर शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजय सरकार (Ajay Sarkar) असे या माजी अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. शनिवारी रात्री शहरातील बंगाली कॅम्प भागात वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धक्कादायक म्हणजे, हत्या-दंगली सारखे गुन्हे या माजी नगरसेवकावर आहे.

बंगाली कॅम्प भागात अजय सरकार (Ajay Sarkar) याचे मोठे वर्चस्व आहे. मागील वर्षभरात टोळीयुद्ध सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार यांचा समावेश असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. गेली 5 वर्षे चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. महिनाभरात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!