Satara News : सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समिती निवडणुकीसाठी 119 अर्ज दाखल

Satara Election Market Committee News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी 9 बाजार समित्यांमध्ये तब्बल 119 अर्ज दाखल झाले आहेत. तर 482 अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत 151 अर्ज दाखल झाले आहेत. कोरेगावमध्ये सर्वाधिक 27 अर्ज दाखल झाले असून सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी झुंबड उडणार आहे.

सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींची निवडणूक होत आहे. या 9 बाजार समितींमध्ये नव्याने समावेश झालेल्या मतदारांची संख्या लक्षात घेता 30 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

साताऱ्यात खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होत आहे. कोरेगावात आमदार महेश शिंदे यांचा गट व आमदार शशिकांत शिंदे गट यांच्यात लढत होत आहे. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट व आमदार रामराजे नाईक निंबाळकर गट यांच्यात लढत असून कराड येथे आ. बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, डाॅ. अतुल भोसले यांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पाटणला सत्यजितसिह पाटणकर आणि शंभूराज देसाई गटात लढती होत आहेत.