हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शिवसेनेचे 12 आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, शिवसेनेचे 12 खासदार बाहेर पडण्याचा तयारीत असून ते शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत सामील होतील. मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे,कारण त्यांच्याकडे 2 तृतीयांश आमदारांची संख्या आहे असेही दानवे म्हणाले.
यावेळी त्यांनी अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्यातील वादाचा दाखला दिला. अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्यात सायकल चिन्हा वरून कोर्टात वाद झाला होता. पण 2 तृतीयांश आमदार असल्याने सायकल हे चिन्ह अखिलेश यादवांना मिळालं अस रावसाहेब दानवे म्हणाले.