औरंगाबाद नामांतराबाबत पवारांचे वक्तव्य हास्यास्पद; जलील यांचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद झाला नव्हता, हा निर्णय शेवटच्या क्षणी झाला अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून अंतर राखले होते. त्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे हे विधान हास्यास्पद आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

औरंगाबाद नामांतराबाबत स्पष्टीकरण द्यायला शरद पवारांना इतका उशीर का लागला?? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. शरद पवार यांना माहिती नव्हतं तर मग कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावत होते का? जयंत पाटील का बैठकीतून बाहेर पडले नाहीत? अस म्हणत नामांतराबाबत पवारांचे विधान हास्यास्पद आहे अस इम्तियाज जलील यांनी म्हंटल.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते-

औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद झाला नव्हता, हा निर्णय शेवटच्या क्षणी झाला. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात हा विषय नव्हता. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा होता अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरून हात झटकले होते.

Leave a Comment