पाटण ग्रुप विकास सोसायटीत राष्ट्रवादीचा 13-0 असा विजय, देसाई गटाचा दारूण पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण |  संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागलेल्या पाटण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले. विरोधी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई गट पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचा 13-0 असा नामुष्कीजनक पराभव झाला.

पाटण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाटणकर गटाच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. यात अशोकराव गजरे व कृष्णत सुतार यांची यापुर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित 11 जागांसाठी मतदान व मतमोजणी झाली. यावेळी 398 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . पाटणकर गटाच्या शेतकरी पॅनेलच्या 11 उमेदवारांना सरासरी 275 ते 300 तर विरोधी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी 70 ते 85 मते मिळाली. विरोधी काही उमेदवारांचे डिपाॅझीटही जप्त झाले. ‌तर सरासरी 20 ते 35 मते बाद झाली .शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांचा सरासरी 200 ते 225 इतक्या प्रचंड मताधिक्यांनी विजय झाला.

रघुनाथ चौधरी, चंद्रकांत टोळे, राजाराम ढोपरे, मारुती नायकवडी ,आनंदा पवार ,विष्णू पवार ,संजय पवार, संपत शिर्के , सौ.अंजनी जाधव , सौ. सुनंदा पवार, चंद्रकांत माने हे बहुमताने विजयी झाले. या निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी घोषणा देत, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली. विजयी उमेदवारांचे विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, तालुका दूध संघ चेअरमन सुभाषराव पवार, शेती बाजार समिती सभापती रेखाताई पाटील, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, जि.प.माजी शिक्षण सभापती राजेश पवार , पाटण नगराध्यक्षा सौ.मंगल कांबळे, उप नगराध्यक्ष सागर पोतदार, सचिन कुंभार,उमेश टोळे, महादेव भोसले ,संजय टोळे आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले.

Leave a Comment