हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच चीनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या हेनान प्रांतात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये आग लागल्यामुळे 13 मुलांना आपला गमवावा लागला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी दुशू शहरातील यानशानपु गावाच्या यिंगकाई शाळेतील हॉस्टेलला आग लागल्याची माहिती अग्निशामक विभागाला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 11 च्या सुमारास शाळेतील हॉस्टेलमध्ये आग लागल्याने परिसरात गोंधळ उडाला. यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी लगेच अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशामक दलाच्या मदतीने 11:30 पर्यंत ही आग विझवण्यात आली. तसेच शाळेत अडकलेल्या सर्वांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. आग लागलेल्या हॉस्टेलमध्ये एकूण 30 मुले अडकली होती. यातील 13 मुलांचा दुदैवी मृत्यू झाला.
या सर्व घटनेमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 13 मुलांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यिंगकाई ही एक खाजगी शाळा आहे. जी केल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. ही शाळा ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. त्यावेळी विद्यार्थी तिसऱ्या मजल्यावर होते. सध्या ही आग कशी लागली याचा पोलीस तपास करीत आहेत. मग अद्याप त्यांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.