हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : जर आज तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर स्टेशनवर जाण्यापूर्वी ही बातमी वाचा. आज रेल्वेकडून शंभरहून जास्त गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुमची ट्रेन देखील रद्द होण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, रेल्वेकडून आज विविध कारणांमुळे 133 गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी 106 गाड्या या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 27 गाड्या या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी एकदा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा. Train Cancelled
रेल्वेकडून 14 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता त्रास टाळण्यासाठी या गाड्यांचे नवीन मार्गही जाणून घेणे आवश्यक ठरेल. याशिवाय रेल्वे विभागाने 6 गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. म्हणजेच आता या गाड्या पूर्वनियोजित वेळेऐवजी नव्या वेळेवर सुटणार आहे. Train Cancelled
या कारणांमुळे रद्द केल्या गाड्या
सध्या अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे, ज्याचा परिणाम हा गाड्यांच्या वाहतुकीवर झाला आहे. आज रद्द झालेल्या बहुतांश गाड्या महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांमधून जाणार होत्या. याशिवाय ट्रॅफिक ब्लॉकमुळे गाड्या रद्द कराव्या लागतात. महाराष्ट्रातील गोंदिया येथे प्रवासी आणि मालगाडी यांच्यातील धडकेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्तीसगड-राजस्थान दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. Train Cancelled
रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा
IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ मोठ्या बँकांनी वाढवले FD वरील व्याजदर !!!
PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!
HDFC Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!!
Bank FD : आता ‘या’ 2 बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा