नवी दिल्ली । आजच्या धावपळीच्या जगात आणि बदललेल्या जीवनशैलीत डोकेदुखी हा एक सामान्य त्रास झाला आहे. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी अशा रुग्णांच्या डेटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगातील 52% लोकांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या डोकेदुखीचा त्रास होतो आहे. यामध्ये मायग्रेन, सामान्य डोकेदुखी, चिंतेमुळे होणारी डोकेदुखी इ. समाविष्ट आहेत.
शास्त्रज्ञांनी 1961 ते 2020 पर्यंतच्या केलेल्या संशोधनांच्या अभ्यासानुसार, जगातील 14% लोकं मायग्रेनचे रुग्ण आहेत. त्याच वेळी, 26% लोकं इतकी काळजी करतात की ते गंभीर डोकेदुखीला बळी पडतात. या संशोधनानुसार, जगातील 15.8% लोकांना दररोज डोकेदुखीचा त्रास होतो.
महिलांमध्ये डोकेदुखीची समस्या जास्त असते
या संशोधकांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांना सर्व प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास होतो. मायग्रेनबद्दल बोलायचे तर जगभरात 17% स्त्रिया याच्या रुग्ण आहेत, तर केवळ 8.5% पुरुषांना मायग्रेनचा त्रास होतो. सुमारे 6% महिलांना 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सतत डोकेदुखी असते तर पुरुषांमध्ये ही टक्केवारी फक्त 2.9% आहे.
2019 मध्ये ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजने केलेल्या अभ्यासात असेच काहीसे दिसून आले. यामध्ये असे आढळून आले की, मायग्रेन हे जगभरातील अपंगत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे आणि 50 वर्षांखालील महिलांमध्ये अपंगत्वाचे पहिले प्रमुख कारण आहे.
लोकांमध्ये मायग्रेन वाढण्यामागची कारणे
दरवर्षी मायग्रेनची समस्या वाढतच आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे संशोधनात सहभागी संशोधकांचे म्हणणे आहे. हे मानसिक ते शारीरिक, पर्यावरणीय, वर्तणूक आणि मानसिक असू शकतात. मात्र, यामध्ये तंत्रज्ञानाचा विकासही महत्त्वाची भूमिका बजावतो.