महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे अतोनात प्रयत्न केल्याने पुढील 25 एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आला.

अल्पभूधारक शेतकरी नितीन शिंदे, प्रकाश शिंदे ,भीमराव जाधव, तानाजी भोसले, मोहन जाधव यांचा सुमारे 15 एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकरी वसंत सुर्वे, सागर नलवडे, रोहित चन्ने, शंकर नायकवडी, अभिजित पाटील, मनोज सुर्यवंशी, जीवन शेटे, सादिक पिरजादे, राजू बागवान, सचिन शिंदे, लाला शिंदे, अल्ताफ शेख, कौशल धर्मे \, इंद्रजित थोरात, आकाश धर्मे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे पुढील घटना टाळली.

दरम्यान, या घटनेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आगीत जळून खाक झाला. ग्रामीण भागांत सर्रास महावितरणच्या वाकडे पोल, लोंबत्या तारा, उघडे डीपी हे चित्र पहायला मिळत असून महावितरण अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी पिक जळण्याच्या घटना घडतात. याची दखल न घेणा-या महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment