कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींची निवडणूक होणार आहे. या बाजार समितीमध्ये कराडच्या बाजार समितीत वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, डाॅ. अतुल भोसले, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. दरम्यान शुक्रवारी दि. 31 रोजी पाचव्या दिवशी 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आजपर्यंत एकूण 24 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणजेच काका-बाबा गट एकत्रित आला आहे. तर कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते अतुल भोसले यांच्या गटामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामध्ये कोणता गट कोणाशी हात मिळवणे करतोय आणि बाजार समितीमध्ये आपली सत्ता काबीज करतोय ही चर्चा सध्या तालुक्यामध्ये सुरू आहे.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, भाजप नेते डाॅ. अतुल भोसले, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आपापल्या गटातील उमेदवार उभे करण्याची तयारी केली जात तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे या गटातील इच्छुक आपापल्या कार्यकर्त्यांसह निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कराड बाजार समितीमध्ये येत आहेत. कराड तालुक्यासाठी महत्त्वाची समजली जाणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून दिसून येत आहे.
कराड बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापलं : पाचव्या दिवशी 16 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल pic.twitter.com/UpAYHXxCOK
— santosh gurav (@santosh29590931) March 31, 2023
पाचव्या दिवशी 16 इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल
1) कृषी पत व बहुउद्देशीय मतदार संघातून : धनाजी दादासो थोरात, राहूल अमृतराव पवार, विजयकुमार सुभाष कदम, दिपक (प्रकाश) आकाराम पाटील (सुपने), प्रमोद बाळासो कणसे, अशोक बाबुराव पाटील, दिलीपराव दाजी पाटील
2) महिला प्रवर्गातून : विजयमाला रामचंद्र मोहिते, रेखाताई दिलीप पवार
3) मागास प्रवर्गातून : सपंत लक्ष्मण कुंभार, फिरोज अल्ली इनामदार
4) ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण वर्गातून : तुकाराम निवृत्ती डुबल (म्होप्रे),
5) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातून : शंकर दिनकर इंगवले, आनंदराव भिमराव मोहिते
6) व्यापारी आडते मतदार संघ : जगन्नाथ बळी लावंड, जयंतीलाल चतुरदास (मनुभाई) पटेल
सातारा जिल्ह्यात ‘या’ बाजार समिती निवडणुकीत होणार ‘काटे कि टक्कर’
असा आहे निवडणूक कार्यक्रम
यामध्ये दि. 27 मार्च ते दि. 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. 27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी आहे. मुख्य अर्ज छाननी ही 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तर प्रत्यक्ष मतदान दि. 30 एप्रिलला सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच याच दिवशी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे.