कराडात अल्पवयीन युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून; परिसरात एकच खळबळ

0
58
Karad Crime News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

अल्पवयीन युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी बाराडबरे परिसरात घडली. धारदार शस्त्राने वार करून तीन संशयित पसार झाले. आदित्य गौतम बनसोडे (वय 16 रा. बाराडबरे परिसर, कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य बनसोडे हा बाराडबरे परिसरात राहतो. सोमवारी दुपारी तो बाराडबरे परिसरात रत्नवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी तीन संशयित युवक तेथे आले. त्यांनी आदित्यवर वार करायला सुरूवात केली. आदित्यने आरडाओरडा केला. तिनही संशयितांनी पोटावर वार केल्याने आदित्य रस्त्यावर पडला. रक्तास्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हल्ला करून संशयित पसार झाले. हा प्रकार पाहून परिसरातील लोक घटनास्थळी धावले. आदित्यच्या कुटूंबियांनी नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तेथे प्रार्थमिक उपचार करून त्याला कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. कृष्णा रूग्णालयातील डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. Karad Crime News

या घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले. आदित्यचा खून कशासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे. रात्री उशीरा याप्रकरणी आदित्याचे वडिल गौतम बनसोडे यांनी शहर पोलिसात खबर दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here