Wednesday, February 1, 2023

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ते चक्क पितात एकमेकांचे रक्त, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

- Advertisement -

बर्लिन । एखादे जोडपे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी कशा कशा युक्त्या वापरतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. इटलीच्या (Italy) एका अनोख्या प्रेमी जोड्ड्प्याबद्दल ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो आहे. येथे 30 वर्षीय मॅगो डेनिस आणि 20 वर्षीय इलेरिया हे एकमेकांचे रक्त पिऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या जोडप्याने रक्त पिण्याचे अनेक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केले आहेत.

हे जोडपे एका सर्कसमध्ये एकमेकांना भेटले. यानंतर त्यांनी एकमेकांबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. जर्मनीमध्ये, त्यांनी एका व्हँपायर-आधारित शोमध्ये भाग घेतला आणि पहिल्यांदा तिथेच त्यांनी एकमेकांचे रक्त प्याले. यानंतर या जोडप्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा असे करणे सुरू ठेवले.

- Advertisement -

https://t.co/9iO7cDOfcg?amp=1

या पती-पत्नीचा असा विश्वास आहे की, असे केल्याने ते एकमेकांप्रति समर्पण करतात. हे जोडपे सिरिंजच्या मदतीने एकमेकांच्या शरीरातून रक्त काढतात आणि मग ते पितात. यामुळे त्या दोघांमधील प्रेम खूप वाढत आहे असं या जोडप्याने म्हटलं आहे.

https://t.co/GpEvayE61T?amp=1

https://t.co/he93edjMwf?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.