हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होती. त्यामुळे आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
नवे वर्ष सुरू झाल्यामुळे आता किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी जमा करण्यात येईल असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. अशातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जमा केला जाऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळावा हप्ता जमा करण्याचा विचार करत आहे. शक्यतो हा सोळावा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस तारीख सांगण्यात आलेली आहे.
दरम्यान, देशभरातील कोट्याहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये देते. अशा तऱ्हेने एका वर्षाला शेतकऱ्यांना सरकारकडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता नव्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. हा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.