हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त एक दिवसासाठी पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मध्य भागातील रस्ते शुक्रवारी पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येतील. परंतु गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच मध्य भागातील रस्ते बंद केले जातील. तर, 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 पर्यंत ते 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी असेल. त्याचबरोबर, विसर्जनासाठीची मिरवणूकच्या मार्गाने काढण्यात येईल ते उपमार्ग देखील बंद असतील. त्यामुळे नागरिकांनी या बाबी लक्षात घेऊन देण्यात आलेल्या पर्यायी वाहतूक रस्त्यांचा वापर करावा.
बंद असणारे रस्ते
1) शिवाजी रस्ता
2) लक्ष्मी रस्ता
3) कुमठेकर रस्ता
4) बाजीराव रस्ता
5) गणेश रस्ता
6) केळकर रस्ता
7) टिळक रस्ता
8) शास्त्री रस्ता
9) जंगली महाजन रस्ता
10) कर्वे रस्ता
11) फर्ग्युसन रस्ता
12) भांडारकर रस्ता
13) पुणे सातारा रस्ता
14) सोलापुर रस्ता
15) प्रभात रस्ता
16) बगाडे रस्ता
17) गुरू नानक रस्ता
वळवलेले मार्ग कोणते?
1) जंगली महाराज रस्ता झाशी राणी चौक असा वळवला आहे.
2) शिवाजी रस्ता हा काकासाहेब गाडगीळ पुतळा असा वळवला आहे.
3) मुदलीयार रस्ता हा अपोलो टॉकीज / दारूवाला पूल असा सुरू असेल.
4) लक्ष्मी रस्ता देखील संत कबीर पोलिस चौकी असा असेल.
5) सोलापूर रस्ता हा सेव्हन लव्हज चौक सुरू असेल.
6) सातारा रस्ता हा व्होल्गा चौक वळवण्यात आला आहे.
7) बाजीराव रस्ता सावरकर पुतळा चौकपर्यंत वळवला आहे.
8) लाल बहादूर शास्त्री रस्ता देखील सेनादत्त पोलिस चौकीपर्यंत वळवला आहे.
9) कर्वे रस्ता हा नळस्टॉप वळवण्यात आला आहे.
10) फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा गुडलक चौक असा वळवला आहे.