गुड न्यूज! राज्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त; देण्यात आला डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर करोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 19 झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल,पुणे 1,सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये मुंबई 12,पुणे 5,औरंगाबाद 1, नागपूर 1 असा तपशील आहे. करोना व्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याचे प्रमाण वाढणार आहे अशी दिलासादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

राज्यात आतापर्यंत ४,२२८ जणांची करोनाची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४,०१७ जणांचा टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला तर १३५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असं राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या १९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते आता पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान आज पिंपरी-चिंचवडमधील ३ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे. गेल्या १४ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचा डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment