पुण्यातील पहिली ते आठवी शाळा पूर्णवेळ सुरु; अजित पवारांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यातील शाळा १ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग हे हाफ डे पद्धतीने सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आता पूर्णवेळ शाळा भरतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. ज्या वेळेस शाळा सुरु करण्याची माहिती देण्यात आली होती तेव्हा त्यावेळच्या परिस्थिती नुसार शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आत्ताची स्थिती पाहता पुण्यात पहिले ते आठवी शाळा पुर्ण वेळ शाळा सुरु होणार असल्याची अजित पवारांनी दिली

दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंधात कोणतीही शिथिलता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुण्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली.