दामदुप्पट पैसे देतो असे सांगून 15 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पावधीत पैसे दुप्पट देतो असे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलं आहे. या प्रकरणी पंढरपूर येथील संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथेमश सुरेश कट्टे यांच्यासह एकावर फसवणुकीचा‌ गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडालीय.

याबाबत माहिती अशी की, सदर आरोपींशी ओळख असल्याने फिर्यादी सुरेश भिसे यांनी शेती खरेदी करण्याची इच्छा दोघांना बोलून दाखवली. याच संधीचा फायदा घेत आरोपी कट्टे आणि कोरके यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवुन दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. यासाठी भिसेला एच डी एफ सी बँकेतून कर्ज मिळवून दिले. 9 सप्टेंबर 2019 रोजी भिसेनी 15 लाख रुपये दामदुप्पट करण्याच्या अमिषा पोटी प्रथमेश कट्टेच्या खात्यात जमा केले.

त्यानंतर अद्याप कट्टे याने ते पैसे परत केले नाहीत. पैसे मागितल्यावर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर भिसे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रथमेश कट्टे आणि शुभम कोरकेवर भा द वि 420, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment