हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी अनेक बँकांकडून आपल्या एफडी आणि बचत खात्याच्यावरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये आणखी 2 खाजगी बँकांचा देखील समावेश झाला आहे. हे लक्षात घ्या कि, आयसीआयसीआय आणि एक्सिस बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates
ICICI Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात तर एक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. 26 सप्टेंबर 2022 पासून या दोन्ही बँकांचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता ICICI बँकेकडून जास्तीत जास्त 6.10 टक्के तर एक्सिस बँकेकडून जास्तीत जास्त 6.90 टक्के व्याज दर मिळेल. FD Rates
ICICI बँकेचे नवीन व्याजदर
या बदल नंतर आता ICICI बँकेकडून 7-29 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के, 30-90 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के आणि 91-120 दिवसांच्या FD वर 4 टक्के व्याज दर दिला जाईल. मात्र 121-184 दिवसांच्या एफडीसाठीचे व्याजदर आधी सारखेच राहतील. हे जाणून घ्या कि, बँकेकडून 185 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.65 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्ष या कालावधीसाठी 5.50 टक्के, 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे मुदतीच्या FD वर 5.60 टक्के, 3 वर्षे एक दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 6.10 टक्के आणि 5 वर्षे एक दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 5.90 टक्के व्याज दिले जात आहे. तसेच प्रत्येक कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल. FD Rates
एक्सिस बँकेचे नवीन व्याजदर
एक्सिस बँकेकडून आता 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या एफडीवर 3.75 टक्के ते 6.90 टक्के व्याज दर दिले जाईल. त्याचबरोबर 50 कोटी ते 100 कोटी रुपयांच्या एफडीवर 4.65 टक्के ते 6.90 टक्के व्याज दिले जाईल. आता बँक 2-5 कोटींच्या 30-45 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के, 46-60 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के आणि 61 दिवसांपासून 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज देईल. यानंतर ग्राहकांना 3 महिन्यांपासून ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.65 टक्के, 6 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.90 टक्के आणि 9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.20 टक्के व्याज दर मिळेल. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!
Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा
‘या’ Multibagger Stock ने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज