व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार? शिंदे गटाने वाढवले उद्धव ठाकरेंचे टेन्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या समवेत 40 आमदारांनी शिवसेनेतून  बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना मोठा दणका दिला. त्यानंतर आता शिवसेनेतील आणखी 2 आमदार फुटणार असा दावा करत मंत्री संदीपान भुमरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. भुमरे यांच्या दाव्याने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन मात्र नक्कीच वाढले असेल.

औरंगाबाद येथील पैठण मधील एका कार्यक्रमात बोलताना भुमरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या गटातील 2 आमदार लवकरच फुटणार आहेत. त्यातील एकजण आम्हांला भेटला आहे तर दुसराही आमच्या संपर्कात आहे असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली. त्यामुळे हे 2 आमदार नेमके कोण या चर्चेला आता उधाण आलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी शिवसेनेतील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. शिंदे यांच्यासमवेत तब्बल 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरेंना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. 40 आमदारांसह 12 खासदारही शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेना मोठा झटका शिंदे गटाने दिला आहे. सध्या शिंदे vs ठाकरे हा सत्तासंघर्ष घटनापीठासमोर आहे.