Tuesday, January 7, 2025

EMV वरून मरकडवाडीतील ग्रामस्थांमध्येही २ मतप्रवाह; नेमकं म्हणणं काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. या निवडणुकांमध्ये माळशिरस मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी विजय मिळवला. उत्तमराव जानकर यांनी तब्बल 13000 मतांनी भाजपच्या विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना मात दिली. मात्र विजयी होऊन देखील जानकारांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला आणि पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली.

उत्तमराव जानकारांनी केलेल्या या मागणीला उपविभागीय दांडाधिकाऱ्यांकडून फेटाळून लावण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन देखील केले. खरे तर ज्या ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर काँग्रेस व विरोधक अक्रमकाची भूमिका घेत आहेत. त्या ईव्हीएम मशिनसाठी काँग्रेसनेस पुढाकार घेतला होता. तेच काँग्रेस आज ईव्हीएमबाबत भाजपला धारेवर धरत आहे.

या सगळ्या प्रकरणांमध्ये वन इंडिया मराठीच्या टिमने ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी, “हे लोक लोकशाहीलाच आव्हान देत आहेत. हे विसरू नका, ईव्हीएम काँग्रेसने आणले होते.” असे स्वतः ग्रामस्थांनीच म्हणले. यासह महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मशीनचा वापर करून विजय मिळवला त्यावेळी कोणी बोलले नाही, अशी देखील टीका केली.

यासह, “ईव्हीएमबाबत शंका होती, तर त्यांनी ते लोकसभा निवडणुकीत का मांडले नाहीत? आत्ता सुरु असलेला संधीसाधूपणा हा घटनाविरोधी आहे.” असे स्वतः ग्रामस्थांनी म्हणले. सातपुते यांच्या विषयी सांगताना, “देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादांच्या कारभाराने त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त उपक्रम आणि महिलांच्या कल्याणकारी योजनांबद्दल कौतुक या निवडणुकीत झाले. मतदाराला त्यांची शक्ती माहित आहे आणि त्यांनी त्यांच्या योगदानाच्या आधारे सातपुते यांची निवड केली होती.” असे ग्रामस्थांनी रोखठोकपणे सांगितले. थोडक्यात ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांमध्ये मतप्रवाह निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.