सातारा जिल्ह्यात आज पुन्हा २१ नवे कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा २१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स आमोद गडीकर यांनी दिली आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या कराड तालुक्यातही ६ नवीन रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यात २, पाटण १, जावळी १, वाई २, कराड ६, फलटण १, खटाव १, कोरेगाव ४, इतर २ अशी संख्या आहे. ग्रामिण भागात कोरोना विषाणुने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, पुणे आणि मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईनचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना आजारा संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करुन घेण्याच्या सुचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे –

सातारा – शाहूनगर – 2, वाढेफाटा
– 1
पाटण – उरुल – 1
जावळी – गांजे  – 1
वाई – शेलारवाडी – 2
कराड – तुळसण- 4, मालखेड -1, तारूख – 1
फलटण – वडले – 1
खटाव – मायणी -1
कोरेगाव – पवारवाडी – 4
औरंगाबाद जिल्ह्यातील -1
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील – 1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment