खळबळजनक ! कोरोनाचे अनुदान मिळविण्यासाठी 216 जिवंत व्यक्तींना दाखवले मृत

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पैशांसाठी आजकाल कोण काय करेल सांगता येत नाही. बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत असाच एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे. यामध्ये 216 जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत. आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा आहे की पैशांसाठीची हेराफेरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाचे अनुदान मिळविण्यासाठी 216 जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेकांचे नातेवाईक मृत पावल्याने त्यांची कागदपत्रही घेण्यात आली नव्हती. या प्रकरणातही फेरफार केल्याची शक्यता वाढली आहे. नावं व्हेरिफिकेशन करताना या मध्ये नावांचा गौडबंगाल असल्याचं समोर आलंय. मृत व्यक्तींच्या डिटेल्स मिळवताना थेट जिवंत व्यक्ती समोर आल्या आहेत

50 हजारांसाठी घोटाळा ?
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत मिळते. ही मदत लाटण्यासाठी काही सरकारी बाबूंनी ही खोटी नावं तयार करून सरकारी आकड्यांमध्ये घुसवली, आणि त्यातून पैसे उकळले, असा संशय व्यक्त होत आहे.