औरंगाबाद प्रतिनिधी | लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात 22 वर्षीय नावविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात घडली. संजीवनी तेजस देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे.
मृत संजीवणीचा 31 मे 2019 ला थाटामाटात लग्न पार पडले होते लग्नाला अवघे दीड महिने होत नाहीत तर संजीवणीने राहत्याघरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विवाहितेवर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.
मात्र सासरच्या जाचाला कंटाळून संजीवणीने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जो पर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून मृत संजीवणीला त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी माहिती मृत संजीवनीच्या आईने दिली आहे..