अहमदनगर प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यात बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत भ्रष्टाचार झाला आहे. तो भ्रष्टाचार २५ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्याची देखील जळगाव घरकुल घोटाळ्याप्रमाणे निःपक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केली आहे. ते नगर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह
राज्य सहकारी बँकेत झालेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी निःपक्षपातीपणे करण्यात यावी. त्याच प्रमाणे या तपासात कर्तव्य कठोर आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. तसेच तपास नियोजित वेळेत लागावा अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यांनी पोलीस अधीक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सत्काराचे कारण हे की , पोलीस अधिक्षक इशू सिंधू हे जळगाव घोटाळा प्रकरणाचे तपास अधिकारी होते. त्यांनी ज्या प्रमाणे राजकीय दबावाला बळी नपडता तपास पूर्ण केला. तशा प्रकारचा तपास बँक घोटाळा आणि साखर कारखान्यांच्या घोटाळ्यांचा झाला पाहिजे असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.
भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा
अण्णा हजारे यांनी मागेच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत त्यांनी शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांना या साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे दोषी मानले होते. अण्णा हजारे यांनी केलेले आरोप शरद पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. तेव्हा त्यांनी अण्णा हजारे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचे देखील म्हणले होते.