बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Sucide) केली आहे. या विवाहितेला सासरची लोकं तुला मूल जन्माला येत नाही म्हणून दोष देत होते. तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणून वारंवार महिलेला त्रास दिला जात होता. या महिलेच्या पतीसह सासरचे लोक तिला त्रास देत होते. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर या 26 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या घटनेने बुलडाण्यात खळबळ माजली आहे.
मलकापूर हादरलं!
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वाघुळ या गावात 26 वर्षांच्या महिलेचा गळफास (Sucide) घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली. आत्महत्या (Sucide) करणाऱ्या महिलेला दोन मुली असून तुला मुलीच होतात, मुलगा होता नाही, असं म्हणत वारंवार त्रास दिला जात होता. शिवाय आईवडिलांकडून हुंड्यातील राहिलेले 50 हजार रुपये घेऊन ये, यासाठी या महिलेकडे सासरच्या लोकांनी सारखा तगादा लावला होता.
अखेर या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ज्योती सानिसे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत ज्योती सनिसे हीचा पती गजानन सनिसे, सासू इंद्रायणी सनिसे, सासरे दशरथ सनिसे , दीर दीपक सनिसे, जेठाणी नंदा सनिसे, सविता दीपक सनिसे, नणंद ज्योति विलास वावगे यांच्या विरुद्ध मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार