अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमुळे क्लासवन अधिकारी गोत्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – जखणगाव येथील महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारी अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात त्या महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

या लोकांनी अश्लील व्हिडिओ तयार केल्यानंतर आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी या अधिकार्‍याकडे तीन कोटींची खंडणी मागितली. यामधील 80 हजार रूपये या अधिकाऱ्याने त्यांना दिले होते. त्या अधिकाऱ्याला घरी बोलावून त्याला शरीरसंबंध करण्यास भाग पाडून महिला व तिच्या साथीदारांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. या प्रकरणात महिलेचा खास एजंट अमोल मोरे, सचिन खेसे, सागर खरमाळे, महेश बागले यांचा समावेश आहे. पोलिसांनी सचिन खेसे याला अटक केली आहे.

या गुन्ह्यात आणखी आरोपी सामील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. या महिलेने आणि तिच्या साथीदाराने अशा पद्धतीने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. या हनीट्रॅपमध्ये अडकलेला सदर अधिकारी जखणगाव शेजारच्या गावातील रहिवासी आहे. या महिलेच्या विरोधात खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क साधून आपल्याबाबत घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणाचा अधिक तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.