पंढरपुरात 30 वीज वाहक टाॅवर कापले; शेतकर्‍यांचा होता टाॅवरला विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | सोलापूर येथील एनटीपीसी ने उभारलेले सुमारे 30 वीज वाहक टाॅवर अज्ञात लोकांनी कटरच्या साहाय्याने कापून टाकले आहेत. यामध्ये कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर ते उजनी धरण या दरम्यान एनटीपीसीने तीन हजार शेतकर्यांच्या शेतात वीज वाहक टाॅवर उभारले आहेत. दरम्यान शेतात उभारलेल्या टाॅवरच्या जागेची चौपट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून शेतकरी करत आहेत.

परंतु शेतकर्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष आहे. यातूनच शेतकर्यांनी उभारलेले टाॅवर कापून पाडल्याची चर्चा आहे. तालुक्यातील आढीव, देगाव, सरकोली, आंबे, चिलाईवाडी, गुरसाळे या भागातील 30 टाॅवर कापून टाकल्याची माहिती आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतातून ही वीज वाहक तार गेली असल्याने यात शेतकऱ्यांची बरीच जागा गुंतून पडली आहे. त्याचा मोबदला मिळावा म्हणून शेतकरी बऱ्याच दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.