औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचीही गर्दी होत आहे.
नरेंद्र मोदींची ही इको फ्रेंडली प्रतिमा शंभर टक्के इको फ्रेंडली आहे. यासाठी वापरण्यात आलेले साहित्य पर्यावरण पूरक आहे. यात 40 किलो शाडू मातीचा मुखवटा तयार करण्यात आला. तसेच प्रतिमेच्या हातांसाठी लाकडी फळ्या वापरण्यात आल्या. तसेच प्रतिमेतील इतर भाग आणि सजावटीसाठी 40 किलो गहू, 20 किलो तांदूळ, कागदी फलक, कापड, फुलझाडे आदी साहित्य वापरण्यात आले.
कोणी साकारली प्रतिमा?
भाजपच्या सांस्कृतिक आघाडी व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिमा साकारण्यात आली. या प्रतिमेचेची निर्मिती केवळ चार दिवसात करण्यात आली. निर्मितीसाठी अलका कोरडे, पल्लवी कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी, चंद्रमुनी जायभाय, ज्ञानेश्वर सागरे, अनिल गावंडे, प्रल्हाद गायकवाड, अतिक पठाण आदींनी मेहनत घेतली. कुलस्वामिनी कार्यालय सिडको येथे ही प्रतिमा पाहण्यास एक आठवडा उपलब्ध असणार असल्याच विलास कोरडे यांनी सांगितलं. आमदार अतुल सावे यांच्या हस्ते नुकतंच या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाऊराव देशमुख, शहर अध्यक्ष संजय केनेकर, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश चिटणीस प्रविणजी घुगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये ,राजेश मेहता, शिवाजी दांडगे, गणेश नावदंर, अरुण पालवे,सतीश खेडेकर, अदवंत माधुरी, रेखा पाटील, मनीषा भन्साली,राऊत ताई,मुंडे मनिषा,दिव्या पाटील,नितीन खरात,थेटे लक्ष्मण, अरुण राऊत,इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.