हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आगामी काळात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यापैकी 3300 कोटी रुपये कोरोनाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे, त्यातील राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत ऑक्सिजन पुरवठयाबाबत चर्चा केली. अंबानी यांनी काही प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे. आजच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली आहे.
ससून रुग्णालयात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट बेड वाढवलेले आहेत. माझी डॉक्टरांना विनंती आहे . आपण ससून रुग्णालय हे कायमस्वरुपी कोव्हिड रुग्णालय बनवणार नाहीत. डॉक्टरांच्या काही मागण्या आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या काही मागण्या असतील तर सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू मात्र, डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं तर सरकारला सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागेल. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अशी मी विनंती घेतो. डॉक्टरांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अशी मी विनंती करतो, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा जीवाचं राण करतेय. डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत आहेत. चतुर्थ आणि त्रितिय श्रेणी कर्मचारी यांना रिक्रुट करण्यासाठी परवानगी दिली आहे. एमबीबीएस डॉक्टर जेवढे मिळायला हवेत ते मिळत नाहीयेत. कुंभमेळा, गॅदरिंग यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. यावेळचा कोरोना लोकांना लवकर कव्हर करतो आहे. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याचे दिसत आहे.