मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या या कोरोना संकटात पोलिस आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा करत आहे. ही सेवा बजावत असताना मुंबई पोलिस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर २४ तासांत ३८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित पोलिसांपैकी ३ हजार २३९ पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत तर ९९१ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत राज्यात ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या अधिक आहे. मुंबईत करोनामुळं दगावलेल्या पोलिसांची संख्या ३७ झाली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिस दलात कोरोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”