भारत जोडो यात्रेत मोठी दुर्घटना; 4 कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

bharat jodo yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा कर्नाटकात आली आहे. तेथील बेल्लारी येथे ४ युवकांना शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत या दुर्घटनेची माहिती दिली. भारत जोडो यात्रेत यात्रेत आज बल्लारीच्या मोका शहराजवळ चार जणांना विजेचा किरकोळ शॉक लागल्याची दुर्दैवी घटना घडली. राहुल गांधी यांनी मला आणि आमदार नागेंद्र यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले आहे . देव दयाळू आहे म्हणून सर्व ठीक आहे. या चौघांनाही काँग्रेस एक लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर हा 3,570 किलोमीटरचा प्रवास १५० दिवसात पूर्ण करणार आहेत. भाजपशासित कर्नाटकात ही यात्रा तब्बल २१ दिवस असणार आहे. यादरम्यान काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते राज्यातील विविध भागात आणि गावांना भेटी देणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.