राज ठाकरे उद्धवजींच्या मदतीला? मनसेचं थेट फडणवीसांना ‘हे’ पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मनसेची नेमकी काय भूमिका असणार यावर तर्क वितर्क लढवले जात असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपने ही पोटनिवडणुक लढवू नये अस म्हंटल आहे.

राज ठाकरे म्हणाले, ”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे.

लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत. माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.