मागील २४ तासात देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; संख्या झाली इतकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे. रविवारी ही संख्या ६२ हजार ९३९ एवढी होती. सध्या ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२०६ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे २ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २२ हजार १७१ रुग्ण आढळले आहेत. तर ८३२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढला आहे. पण लॉकडाऊन वाढवून सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”