२५ सप्टेंबर पासून सुरु होणार ४६ दिवसांची कडक संचारबंदी? 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक  वाढतच आहे.  एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५० लाखांच्या पार झाला आहे.  सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  मात्र अफवांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर २५  सप्टेंबरपासून ४६  दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचा संदेश फिरतो आहे. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे नमूद होते. मात्र पीआयबीने हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. तसेच. व्हायरल होत असलेले हे पत्र बनावट असल्याची माहिती दिली आहे. १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या बनावट आदेशात म्हटले आहे की, “कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशातील मृत्यूदर कमी करण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय व गृह मंत्रालय २५ सप्टेंबर, २०२०  पासून ४६ दिवसांचे क़डक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. 

https://twitter.com/PIBFactCheck/status

संचारबंदी होणार असल्यामुळे  एनडीएमए जीवनाश्यक वस्तूचा साठा करून ठेवण्यासाठी ही पूर्वसूचना बजावत आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. पीआयबी ने असे ट्वीट केले आहे की, ‘असा दावा केला जात आहे की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कथितरीत्या जारी केलेल्या आदेशात त्यांनी २५ सप्टेंबरपासून देशभरातील लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. हा आदेश बनावट आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासाठी प्राधिकरणाने असे कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.