हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षांनी आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. आज विरोधकांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी आज 49 खासदारांना निलंबित केल्यामुळे एकूण निलंबित खासदारांचा आकडा 141 वर पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत. मुख्य म्हणजे, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी ठाकूर यांच्यासह विरोधी पक्षाच्या आणखीन काही खासदारांना निलंबित मारण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणामुळे सरकारी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सभागृहांमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्व विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता हे सर्व खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित असणार आहेत. यापूर्वी 92 खासदारांना सभागृहात निलंबित करण्यात आले होते.