हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office Tax Saving Schemes : Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या योजनांद्वारे काही वर्षांत आपले पैसे सहजपणे दुप्पट होऊ शकतील. सामान्यतः लोकं अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळण्याबरोबरच पैसेही सुरक्षित राहतील. अशातच जर यावर इन्कम टॅक्स सवलत मिळाली तर… हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सवलतीचा लाभ देखील मिळतो. या योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचा समावेश आहे. चला तर त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये कमीत कमी 1000 रुपये जमा करता येतील. तसेच यामध्ये जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवता येतील यासाठी कोणतेही लिमिट नाही. 5 वर्षांत होणारी योजनेसाठी सध्या 7% व्याजदर देण्यात येतो. यामध्ये 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळण्याबरोबरच कर्जाची सुविधा देखील मिळते. Post Office Tax Saving Schemes
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलीच्या नावाने हे खाते उघडता येते. तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीला या खात्याची मालकी मिळते. सध्या या योजनेवर 7.6 टक्के व्याजदर देण्यात येतो आहे. तसेच यामध्ये सुरुवातील कमीत कमी 250 रुपये जमा करून गुंतवणूक सुरु करता येते. त्याचप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करता येतात. या योजनेवर इन्कम टॅक्स कायद्याच्या 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळते. Post Office Tax Saving Schemes
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवर सध्या 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजदर देण्यात येतो आहे. याव्यतिरिक्त, PPF तीनपट टॅक्स बेनेफिट्स देखील देते, कारण IT कायद्याच्या कलम 80C नुसार या योजनेमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांचे योगदान देता येते. या योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स सूट मिळते. Post Office Tax Saving Schemes
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये गुंतवता येतात तर जास्तीच्या गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेच्या खातेदारांना वार्षिक आधारावर 7 टक्के व्याजदर दिला जातो. तसेच यामध्ये 1961 च्या इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ 5 वर्षांसाठी गुंतवणुकीवर लागू आहे.
सिनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS)
60 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही रिटायर व्यक्तीला या योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी तीन वर्षांचा आहे. मात्र पाच वर्षांसाठी ती रिन्यू देखील करता येते. केंद्र सरकार कडून सध्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर वार्षिक 8 टक्के व्याजदर दिला जातो आहे. या योजनेच्या ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्स कायद्याच्या 1961 कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतीचा क्लेम करता येतो. Post Office Tax Saving Schemes
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे