चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा गडचिरोलीतील 500 गावांनी केला निषेध, गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही वाढणार प्रमाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली | महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरु झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातीलही व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे. मागच्या २७ वर्षापासून दारूबंदी असलेल्या ह्या जिल्ह्यात शेकडो गावात संघटना व महिलांनी प्रभावीरित्या दारूबंदी लागू केली आहे. असेही त्यामध्ये गावकऱ्यांनी म्हंटले आहे.

सरकारने १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, २७ मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरु करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू पुन्हा सुरु झाल्यास दारूबंदी असलेल्या लगतच्या गडचिरोली जिल्ह्याला निश्चितच धोका होणार आहे. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीत वाढ होईल. दारूची तस्करी वाढणार. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून याची जबाबदरी घेणे आवश्यक आहे. असे मत गडचिरोलीतील गावांनी व्यक्त केले आहे.

दारूमुळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरी, गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मूळ कारण दारू आहे. मग अशा दारूसारख्या पदार्थाला सरकारने प्रोत्साहन का द्यावे, असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी सरकारला उपस्थित करीत चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यासंदर्भातील निर्णयाचा निषेध केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५०० गावांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून यात सातत्याने वाढ होत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment