विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाने आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठत शेखर बंगाळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा टाकला होता. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आंदोलक शेखर बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धनगर समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर, विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्या व्यक्तीला 51 हजारांच बक्षीस दिल जाईल अशी घोषणा मल्हार सेनेकडून करण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा टाकण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. तर दुसरीकडे विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस देणार असल्याची घोषणा मल्हार सेनेकडून करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा, मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी सेनेने केली आहे. या संबंधित निवेदन पत्र तहसीलदारांना सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी सरकार काय भूमिका घेईल याकडे संपूर्ण धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र काळेंनी मागितली माफी

धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी घेऊन आंदोलक शेखर बंगाळे निवेदन घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्या डोक्यावर भंडारा टाकला. त्यानंतर त्वरित शेखर बंगाळे यांना मागे खेचण्यात आले. तसेच नरेंद्र काळे यांनी बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच, या सर्व घटनेप्रकरणी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर स्वतः नरेंद्र काळे यांनी आपण केलेल्या कृतीची माफी मागितली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्याला 55 हजारांच बक्षीस मल्हार सेनेकडून घोषित करण्यात आलं आहे.