Monday, February 6, 2023

भारतातील कोरोना तपासणी लॅबोरेटरींची संख्या ६३ वर, ९ नवीन तपासणी केंद्र प्रस्तावित

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी स्थानिक प्रशासनासह राज्य आणि केंद्र सरकारनेही महत्त्वाची पावले उचलली आहेत. आरोग्य विभागानेही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत कोरोनाशी लढायला सज्जता दाखवली आहे.

भारतातील कोरोना तपासणी लॅबोरेटरींची संख्या वाढवून ६३ करण्यात आली आहे. एकूण २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या तपासणी लॅबोरेटरी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात नागपूरला एक आणि मुंबईला २ ठिकाणी या लॅब आहेत. आणखी ९ लॅब येत्या आठवड्यात उभ्या करण्याचं नियोजन सुरु असून पुण्यातील आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये यातील नवीन एक केंद्र सुरु करण्यात येईल.

भारतातील कोरोना विषाणू तपासणी केंद्र
- Advertisement -

यानुसार पसरणाऱ्या आजारांच्या विषाणूंचं संशोधन आणि निदान केंद्रांची (व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) संख्या ६२ वर पोहचली आहे. तर दिल्लीमधील राष्ट्रीय आजार नियंत्रण कक्ष पकडून ही संख्या ६३ झाली आहे.