हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला असून ठाण्यातील तब्बल 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र ठाण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या नगरसेवकांमध्ये महापौर नरेश मस्के यांचाही सामावेश आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड ठरले आहे. आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेतील खासदारही एकनाथ शिंदे गटाला समिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुन्हा एकदा जोमाने पक्ष उभारणी करावी लागेल.