वर्षभरात मराठवाड्यात 887 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

0
35
Farmer waiting for Rain
Farmer waiting for Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत र्षभरात 887 शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्या बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. यापैकी 681 शेतकर्‍यांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या चा प्रदेश म्हणूनही मराठवाडा ओळखला जातो. नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे या भागातील शेती नेहमीच तोट्याची राहिली आहे. येथील बहुतांश शेतकरी शेतीवरच अवलंबून असल्याने कोणत्याही कारणाने उत्पादन शेतकरी हताश होऊन जीवन यात्रा संपवितात. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकल्प योजना राबविण्यात येत आहेत. परंतु त्यानंतरही आत्महत्या रोखण्यात यश आलेले नाही. मागील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2019 च्या काळात तब्बल 887 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्यांची नोंद बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्यांची नोंद हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. वर्षभरात सर्वाधिक 101 आत्महत्या या नोव्हेंबर महिन्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल जून महिन्यात 91, ऑक्टोबर 89, डिसेंबर 83, ऑगस्ट 81,सप्टेंबर 80, मार्च 75, फेब्रुवारी 70, जुलै 64, जानेवारी 57, मे 50 तर एप्रिलमध्ये 46 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील जिल्हे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या –
बीड – 210
औरंगाबाद – 172
उस्मानाबाद – 124
नांदेड – 119
परभणी – 83
जालना – 79
लातूर – 64
हिंगोली – 36
एकूण – 887

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here