व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार, 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज पाच राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेत चर्चा केली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही असे टोपे यांनी म्हंटल तसेच राज्यात आता जिल्हा स्तरावर आरोग्य किट तयार करण्यात येणार आहे. टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहिती डॉ. टोपे यांनी दिली.

डॉ. राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत मध्य माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी नागरिकांचे लसीकरण जास्त झाले आहे. त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही कमी आहे. त्यामुळे राज्यात आता लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

राज्यातील जवळपास 90 टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून 69 टक्के लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत. देशभरात क्वारंटाईनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.