‘या’ क्षुल्लक कारणावरून आरोपीकडून भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काळू पावरा या नराधमाने भिक्षुकाने दारात उभे राहून भिक्षा मागितल्याचा राग अनावर न झाल्याने भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील अमरीश नगर या ठिकाणी चैन्या पावरा हा अविवाहित भिक्षुक गावामध्ये दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता. यावेळी गावातीलच काळू गणपत पावरा याच्या घराबाहेर उभे राहून चैन्या पावरा याने भीक मागितली. आपल्या दारासमोर भीक मागितल्याने काळू गणपत पावरा याला आपला राग अनावर झाला. यानंतर काळू गणपत पावरा याने भिक्षुक चैन्या पावराला दंडुक्याने मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

आरोपी घटनास्थळावरून पसार
कालू पावरा याने केलेल्या मारहाणीत चैन्या पावरा हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. यानंतर आरोपीने चैन्या पावरा या भिक्षुकास दूरवर असलेल्या गटाराच्या जवळ टाकून दिले आणि त्या ठिकाणाहून पसार झाला. यानंतर गावातील काही लोकांना चैन्या पावरा हा जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांनी चैन्या पावरा याच्या घरच्यांना त्याची माहिती दिली. भिक्षुक चैन्या पावरा याच्या मोठ्या भावाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत याची माहिती पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना याची माहिती देत पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी चैन्या पावरा याला शासकीय रुग्णालयमध्ये दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी करून आरोपी काळू पावरा याला अटक केली आहे.

You might also like